Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगसातारा-कास मार्गावर दोन वाहनांची समोरासमोर धडक; युवती ठार, 5 जण गंभीर जखमी;...

सातारा-कास मार्गावर दोन वाहनांची समोरासमोर धडक; युवती ठार, 5 जण गंभीर जखमी; धुक्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज

सातारा-कास मार्गावरील येवतेश्वर घाट परिसरात दोन गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाली. दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्व जखमींना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गायत्री दिपक आहेरराव (वय 21) असे अपघातात मृत झालेल्या तरुणीचे नाव आहेशुक्रवारी रात्री सातारा-कास रस्त्यावर येवतेश्वर घाटाजवळ दोन मोटारींची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही गाड्यांमध्ये प्रवासी अडकले. यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या जवानांनी जखमींना बाहेर काढले. त्यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. सातारा तालुका पोलिस रात्री उशिरापर्यंत अपघातस्थळी होते. अपघातग्रस्त वाहने बाजुला करून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला.

अपघाताचे कारण अस्पष्ट
या अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. येवतेश्वर घाट परिसरात मुसळधार पाऊस असल्यामुळे तसेच दाट धुक्यामुळे समोरच्या गाडीचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. साताऱ्याहून कासकडे जाणाऱ्या आणि साताऱ्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या वाहनांची रात्रीच्या वेळी मोठी वर्दळ असते. या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

वडिलांचाही अपघातात मृत्यू
सातारा पालिकेचे कर्मचारी दिपक आहेरराव हे एका अपघातामध्ये मृत पावले होते. त्यांच्या जागेवर दीड वर्षांपूर्वी अनुकंपा तत्वावर सातारा पालिकेत गायत्री रूजू झाली होती. तरुण वयात गायत्रीचे अपघाती निधन झाल्याने सातारा पालिकेचे कर्मचारी आणि सातारकर नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी गायत्री आहेरराव हिच्या मृत्यू प्रकरणी शोक व्यक्त केला आहे. पुढील तपास सातारा तालुका पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -