Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगधाकट्या भावासोबत झोका खेळताना मोठ्या भावाच्या मानेलाच दोरी आवळली, मुलाच्या मृत्यूने हळहळ

धाकट्या भावासोबत झोका खेळताना मोठ्या भावाच्या मानेलाच दोरी आवळली, मुलाच्या मृत्यूने हळहळ

वडील कामाला तर आई काही कामानिमित्त शेजारीच गेली होती. अशावेळी घरात एकटेच असलेले दोघे भाऊ घरातील ‎छतास लोखंडी हुकला लावलेला झोका खेळत होते. धाकट्या भावाचे खेळून झाल्यावर मोठ्या भावाने झोका खेळण्यास सुरूवात केली. मात्र, खेळत असतानाच ‎झोक्याच्या दोरीचा गळ्यालाच फास बसल्याने ‎त्याचा मृत्यू झाला. नाशिकमधील अंबड चुंचाळेच्या‎ म्हाडा ‎कॉलनीत ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत निखिल ‎सोनवणे (वय 10) या मुलाचा मृत्यू झाला.नेमके काय घडले?

वडील कंपनीमध्ये कामाला गेले‎ होते तर आई काही कामासाठी‎ शेजारी गेली होती. निखिल आणि‎ त्याचा लहान भाऊ घरात एकटेच ‎झोका खेळत होते. धाकट्याचा ‎झोका खेळून झाल्यावर निखिलने ‎झोका खेळायला सुरुवात केली.‎ पलंगावरून तो झोका खेळत होता. ‎त्याने झोका गोल-गोल फिरवला‎ आणि त्याच्या मानेलाच झोक्याची ‎दोरी आवळली गेली. आधी तो‎पलंगावर असल्याने त्याला ते‎जाणवले नाही, मात्र त्याने उंच ‎झोका घेण्याच्या प्रयत्नातच त्याच्या‎गळ्याला फास लागला आणि तो‎ खाली पडला. तो काहीच बोलत‎ नसल्याने त्याच्या भाऊ धावतच‎आईकडे गेला. निखिल झोक्यावरून‎ पडला असून काहीच बोलत ‎नसल्याचे सांगताच आई धावतच ‎आली. निखिल निपचित पडला ‎होता. आईने तत्काळ दोरी कापून ‎त्याला उठवण्याचा प्रयत्न केला.‎तोपर्यंत शेजार-पाजारचे लोक जमा‎झाले होते. सगळ्यांनी त्याला जिल्हा‎ रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत खूप‎ उशीर झाला होता.

क्षणात होत्याचे नव्हते, आई-वडिल सुन्न

‎याबाबत अंबड पोलिस‎ ठाण्यात आकस्मात मृत्यूची ‎नोंद करण्यात आली आहे.‎ अचानक घडलेल्या या घटनेने ‎कुटुंबावर दु:खाचा‎ डोंगरच कोसळला आहे.‎ क्षणात खेळत असलेल्या‎ मुलाबाबत असे झाल्याने त्याचे‎ आई-वडील सुन्न झाले‎ आहेत. तर आपल्याशी खेळत‎ असलेला आपला दादा कुठे ‎गेला अशी शोधणारी नजर ‎निखिलच्या धाकट्या भावाची‎ झाली आहे. या घटनेमुळे‎ परिसरातही हळहळ व्यक्त ‎होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -