राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे कोल्हापूर शहरातील पुराबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आले आहेत. मी शिर्डीत असल्याने कोल्हापूरात पूर आला नाही असा दावा त्यांनी केला आहे. याला श्रद्ध म्हणा की अंधश्रद्धा असेही केसरकर यावेळी म्हणालेकेसरकर म्हणाले की, अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा काहीही म्हणा. पण ज्या दिवशी पुराची स्थिती होती त्या दिवशी मी योगायोगाने शिर्डीला होता.
कोल्हापूरात राधानगरीचं पाणी सोडल्यानंतर पाच फुटाने पाण्याची पातळी वाढते हे सगळ्यांना माहितेय. पण या खेपेला एक फुटाने सुद्धा पातळी वाढलं नाही. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही कन्फर्म करु शकता. हे नॉलेज, कॅलक्युलेशन आहे..मी स्वतः तिथे ठाण मांडून होतो, तेथे असताना आपण देवाला प्रार्थना करतो की हे संकट जाऊदे. त्या प्रार्थनेत देखील ताकद असते. तुम्ही कॅलक्युलेशन जाऊन बघा. खरोखर पाच-सहा फुट पाणी आलं असतं तर बरीचशी गावे पाण्याखाली गेली असती, असेही केसरकर यावेळी म्हणाले.