.राज्यात आता यापुढे ऑनलाईन स्वरूपाचे ई-रेशन कार्डच (ration card) मिळणार आहे. त्याचे वितरण सुरू झाले आहे. आता रेशन कार्डची मागणी झाली किंवा त्यात काही दुरुस्ती करण्याची वेळ आली तर त्यापुढे ई-रेशन कार्डच दिले जाणार आहे. यामुळे केशरी आणि पिवळ्या रंगातील पारंपरिक रेशन कार्ड टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे.फोटो स्वरूपात हे ई-रेशन कार्ड हव्या त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ई-सेवा केंद्रातूनही हव्या त्या वेळेला हे कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढता येणार आहे. यामुळे दैनंदिन कामकाजासाठी रेशन कार्ड सोबत घेऊन जाण्याची गरज भासणार नाही.
दोन पानांचेच रेशन कार्ड
नियमित वापरातील ए-4 आकारातील दोन पानांचे हे रेशन कार्ड असेल. त्यावर पारंपरिक रेशन कार्डावरील सर्व माहिती नेमकी आणि सुस्पष्ट असेल. याखेरीज या कार्डवर क्यूआर कोडही असेल. ज्या ठिकाणी हे रेशन कार्ड वापरायचे आहे, त्याठिकाणी संबंधित कार्यालयातील अधिकार्यांनाही हा क्यूआर कोड स्कॅनिंग करता येणार आहे.
दुकानातही घेऊन जायची गरज नाही
दुकानातील कामकाज ई-पॉस मशिनवर चालत असल्याने पारंपरिक रेशन कार्ड दुकानात घेऊन जायची गरजच नाही. ई-कार्डचीही तशी कोणतीही आवश्यकता राहणार नाही.
आता ई-रेशन कार्डच मिळणार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -