Saturday, August 2, 2025
Homeइचलकरंजीसुळकूड पाणी योजना अंमलबजावणीसाठीइचलकरंजीचे शिष्टमंडळ आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

सुळकूड पाणी योजना अंमलबजावणीसाठीइचलकरंजीचे शिष्टमंडळ आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेल्या सुळकूड पाणी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात इचलकरंजी शहरवासियांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज मंगळवार ता. १ रोजी दुपारी साडेबारा वाजता आजी-माजी लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेणार आहेत.

राज्यशासनाने इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीतून सुळकूड उद्भव धरून पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेसाठी शासनाने निधीही मंजूर केला आहे. या योजनेच्या कामकाजाची प्रक्रिया सुरू असताना शनिवारी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आम. संजयबाबा घाटगे आदींच्या नेतृत्वाखाली सुळकूड योजना बचाव समितीच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन या योजनेला विरोध दर्शवून निवेदन सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी या संदर्भातील अभिप्राय शासनाकडे पाठवण्याचे शक्यता आहे.

त्या पार्श्वभुमीवर इचलकरंजी शहरवासियांची दूधगंगा योजना अंमलबजावणीसंदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी आज मंगळवार ता. १ रोजी दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत. यावेळी आजी-माजी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे प्रमुख, नगरसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती दूधगंगा (सुळकूड) पाणी योजना सामंजस्याची भूमिका घ्यावी सुळकूड पाणी योजनेबाबत उलट- सुलट प्रतिक्रिया, पोस्टरबाजी, आंदोलने, मोर्चा काढून संघर्ष न करता सुळकूड योजना पुर्णत्वास नेण्यासाठी सर्वच स्तरातून सामंजस्याची भूमिका घेणे ही काळाची गरज बनली आहे.

त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ही लोकप्रतिनिधी तसेच सहभागी होणाऱ्या सर्वच मान्यवरांनी श्रेयवाद बाजूला ठेवून शहरवासियांसाठी सर्वसमावेशकपणे आपली बाजू अभ्यासपूर्वक ठामपणे मांडावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -