Saturday, August 2, 2025
Homeइचलकरंजीहेरवाड - अब्दुललाट मार्ग खुला; पंचगंगेच्या पाणी पातळीत दीड फुटाने घट!

हेरवाड – अब्दुललाट मार्ग खुला; पंचगंगेच्या पाणी पातळीत दीड फुटाने घट!

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सोमवारी दीड फुटाने घट झाली. धरण क्षेत्रासह शिरोळ तालुक्यात पावसाने उसंत घेतल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होताना दिसत आहे.

रविवारपासून सुमारे तीन फूट पाणी उतरल्याने रविवारी शिरोळ तालुक्यातील चार मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले होते. रविवारी पाण्याच्या पातळीत घट झाल्याने हेरवाड – अब्दुललाट हा मार्ग वाहतूकीसाठी खुला झाला आहे. दरम्यान मंगळवारी सकाळपर्यंत कुरुंदवाड-शिरढोण हा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या पंधरा दिवसापासून शिरोळ तालुक्यात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने आणि पाणी पातळीत वाढ होत होती आणि नागरिकांच्या मध्ये महापुराची भीती निर्माण झाली मात्र, अलमट्टी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

सध्या तेरवाड बंधाऱ्यावर ५४ फूट इतकी पाण्याची पातळी असून शिरोळ बंधाऱ्यावर ४८, यादव पुल ४८ फूट तर कुरुंदवाड – शिरढोण पुलावरून एक फूटाने पाणी वाहत आहे. गेल्या आठवड्याभरात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने तालुक्यातील नागरिकांच्यामध्ये महापुराची भीती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या तीन दिवसापासून अलमट्टीतून सव्वा लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे शिरोळ तालुक्यात महापुराचा धोका टळला, असल्याचे चित्र सध्या शिरोळ तालुक्यातून दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -