संभाजी भिडे (गुरुजी) यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून कारवाई करावी आणि संभाजी भिडे यांच्यावरील खोटे गुन्हे त्वरीत मागे घेण्याची मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रांताधिकारी मौसमी बर्डे – चौगुले यांच्याकडे करण्यात आली.
इचलकरंजीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्यावतीने संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ प्रांतकार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शिवतिर्थावर संभाजी भिडे गुरुजींच्या फलकास दुग्धाभिषेकानंतर प्रेरणामंत्र म्हणून या मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने युवावर्ग सहभागी झाला होता. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी मोसमी बर्डे – चौगुले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यानंतर गजानन महाजन गुरुजी, प्रसाद जाधव, आनंदा सुर्यवंशी, गणेश सुतार यांच्यासह प्रमुखांनी मनोगत व्यक्त केले. या मोर्चात चेतन जाधव, मंगेश मस्कर, नागेश पाटील, म्हाळसाकांत कवडे यांच्यासह धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.