Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगऑगस्टमध्ये पावसाचा अंदाज कसा असणार? पुढील दोन आठवड्यांसाठी पावसाचा अंदाज आला समोर,...

ऑगस्टमध्ये पावसाचा अंदाज कसा असणार? पुढील दोन आठवड्यांसाठी पावसाचा अंदाज आला समोर, जाणून घ्या…

यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने अनेकांची चिंता वाढली होती. असे असताना मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. जुलैमध्ये महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला तर अनेकांचे मोठे नुकसान देखील झाले.काहींना यामध्ये आपला जीव देखील गमवावा लागला. यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. असे असले तरी ऑगस्ट महिन्यात मात्र पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवड्यांत महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे.आता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे. मात्र काही ठिकाणी आजूनही पाऊस झाला नाही.दरम्यान, १ जून ते २७ जुलै या कालावधीत सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

पुणे शहराच्या विविध भागांत पावसाची रिपरिप सुरूच होती. मुंबई परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते.तसेच विदर्भात वर्धा, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांत बुधवारी रात्रीपासून विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. आता मात्र पाऊस थोडा विश्रांती घेणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -