Monday, November 24, 2025
Homeमनोरंजन'मैं निकला गड्डी लेके' सनी देओलच्या 'गदर 2' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या...

‘मैं निकला गड्डी लेके’ सनी देओलच्या ‘गदर 2’ सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) सध्या त्यांच्या आगामी ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. ‘उड जा काले कावा’ हे सिनेमातील पहिलं गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आता ‘में निकला गड्डी लेके’ (Main Nikla Gaddi leke) हे दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

‘मैं निकला गड्डी लेके’ या गाण्याचं नवं वर्जन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. युट्यूबवर हे गाणं ट्रेंडमध्ये आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गाण्याच्या सुरुवातीला जीते त्याच्या वडिलांकडे म्हणजेच तारा सिंहकडे दुचाकीची मागणी करताना दिसत आहे. तर अमीषा पटेलदेखील लेकाची बाजू मांडताना दिसत आहे.  तसेच सनी आणि अमीषाचा रोमँटिक अंदाजदेखील प्रेक्षकांना या गाण्यात पाहायला मिळेल. तारा सिंह आणि सकीनाचं प्रेम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 


‘मै निकला गड्डी लेके’ हे गाणं उदित नारायण यांच्या मुलगा आदित्य नारायणने गायलं आहे. तर शहाना खानने या गाण्याची कोरियोग्राफी केली आहे. या गाण्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गाण्यातील सकीनाचा लूक आणि नृत्यांचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

‘गदर 2’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. सिनेमातील गाणी, टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. अनिल शर्मा (Anil Sharma) दिग्दर्शित हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तारा सिंह आणि सकीनाची प्रेमकहानी प्रेक्षकांना ‘गदर 2’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अॅक्शनसह नाट्य असल्यामुळे हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देणार आहे. शक्तिमान तलवारने या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे. ‘गदर : एक प्रेम कथा’च्या आगामी भागात सनी देओल, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -