Monday, December 23, 2024
Homeसांगलीमिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच झाला हजर

मिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच झाला हजर

सांगलीच्या मिरजेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरज तालुक्यात बापानेच मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची माहिती समोर आली आहे.व्यसनाधिन मुलाच्या बापाने कंटाळून क्रूरपणे त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या मिरजेमध्ये उघडकीस आला आहे. खून करून निर्दयी बापाने कटरने मुलाच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून तलावात फेकल्याचीही माहिती मिळाली आहे. या प्रकरणी बापाला मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे,

रोहित राजेंद्र हंडीफोडे,असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे. मुलाच्या व्यसनाधिनतेला कंटाळून राजेंद्र हंडीफोडे (वय 50) याने हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मिरज शहरातील सुभाष नगर येथे राहत असलेल्या राजेंद्र हंडीफोडे यांनी मुलगा रोहितचा कुऱ्हाडीने खून केला. त्यानंतर रोहितच्या मृतदेहाचे कटरने दोन तुकडे केले. यानंतर एक तुकडा शहरातल्या गणेश तलाव येथे टाकला आणि एक तुकडा गणेश तलावाच्या शेजारीत असणाऱ्या घरामध्ये लपवून ठेवला होता.

या खुनाच्या घटनेनंतर राजेंद्र हंडीफोडेने स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर होत मुलाच्या खुनाची कबुली दिली. त्यानंतर मिरज पोलिसांनी गणेश तलावातून रोहित हंडीफोड याच्या शरीराचा एक तुकडा बाहेर काढला आहे. तर दुसरातुकडा त्याच्या घरात आढळून आला आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद झाली असून खून करणाऱ्या पित्याला अटक करण्यात आली आहे. बापानेच मुलाचा निर्घृण खून केल्याच्या घटनेने मिरज शहर हादरून गेले आहे.

दरम्यान, रोहित हंडीफोडे याला दारू आणि जुगाराचे व्यसन होते. या व्यवसाधिनतेपायी रोहित कुटुंबाला प्रचंड त्रास देत होता. या त्रासाला कंटाळूनच राजेंद्र हंडीफोडे यांनीच मुलाचा खून केल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -