जत शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मोदी मळा येथे अडीच वर्षांच्या स्वतःच्या मुलाला शेततळ्यातून वाचवण्यासाठी गेलेल्या आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली.जत शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मोदी मळा येथे अडीच वर्षांच्या स्वतःच्या मुलाला शेततळ्यातून वाचवण्यासाठी गेलेल्या आईचा मृत्यु झाल्याची घटना घडली. शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या मीनाक्षी चंद्रकांत माने (वय २७) व आलोक चंद्रकांत माने (वय अडीच वर्षे) असे मायलेकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मायलेकाच्या मृत्यूने जत शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जत पोलिसात आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, जत येथील चंद्रकांत माने हे शहरामध्ये राहत होते. मात्र, गेल्या दीड महिन्यापूर्वीच मळ्यातील घरामध्ये वास्तव्यास गेले होते. घरासमोर काही अंतरावरच शेततलाव आहे. गुरुवारी (दि. 3) त्यांचा मुलगा अलोक हा खेळत खेळत शेततलावाकडे गेला.
दरम्यान, आलोकला शोधण्यासाठी गेलेल्याशोधण्यासाठी गेलेल्या आई मीनाक्षी यांना तो शेततलावात पडल्याचे आढळून आले. त्यानंतर मिनाक्षी यांनी आलोकला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, या घटनेत दोन्ही मायलेकरांचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळी (दि. ३) चार वाजण्याच्या सुमारास माने कुटुंबियांनी घरात कोणीच नसल्याचे पाहून चौकशी केली असता दोघेही मायलेक हे शेततलावात पडल्याचे दिसून आले. त्यानंतर दोघांनाही शेतालावातून बाहेर काढण्यात आले.