बोगस कागदपत्रांच्या आधारे जत तालुक्यातील विक्रेत्यांनी एका कंपनीची 510 सीमकार्डस् वेगवेगळ्या नावांनी विक्री केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.याबाबत अधिक माहिती अशी राज्यात बोगस सीमकार्डची पडताळणी सुरू आहे. राज्यात 1 हजार 664 बोगस सीमकार्ड असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील तब्बल 510 बोगस कार्डस् जत तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. याबाबत दूरसंचार विभागाने तशी माहिती पोलिसांकडे दिली. यावरून पोलिसांनी उमराणी येथील तीन विक्रेत्यांनी 388 सीमकार्डस् विक्री केल्याचे उघड केले. तसेच मंगळवार पेठेतील तेली गल्ली येथील विक्रेत्याने तब्बल 122 बोगस सीम कार्डस् वितरित केली. संबंधित कार्डविक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत जतचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे म्हणाले, बोगस कागदपत्राच्या आधारे सीम कार्ड विक्री करणार्या व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. बनावट व बोगस कागदपत्रे दाखल करून फसवणूक केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. अशी कृत्ये करणार्या वर तात्काळ गुन्हे दाखल होतील. याबाबत सायबर क्राईम विभाग अधिक सतर्क आहे.
बोगस कागदपत्रांद्वारे सीमकार्डची विक्री
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -