Thursday, August 7, 2025
Homeसांगलीसांगली जिल्‍हातील एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

सांगली जिल्‍हातील एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

सांगली जिल्‍हातील विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आंतरराज्य टोळीने बँकांचे एटीएम फोडले. सैफुल दुल्ली खान (वय ३७) निसियुम नियाज अहमद (वय २४) व हसन रहेमत (वय ५३, सर्व रा. हरियाणा राज्य) अशी या संशयितांची नावे असून त्यांच्याकडून एकूण ६ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीला पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एटीएम फोडून पलायन केलेली टोळी विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत विटा – तासगांव रस्त्यावरून जात असल्‍याची माहिती पोलीसांना मिळाली. मिळालेल्‍या माहितीवरून पोलीस पथक गस्त घालत असताना येथील एच. पी. पेट्रोलपंपाच्या समोर रस्त्याला तासगांवकडून चारचाकी ( एच. आर. ७४ ए. ५०३० ) आयशर गाडी येत होती. या गाडीला थांबवून पोलिसांनी गाडीची झडती घेतली. यावेळी एका प्लॉस्टीकच्या कागदामध्ये दोन वेल्डीग करण्यासाठी वापरण्यात येणारे सिलेन्डर, गॅस कटर, रबर पाईप, रेग्युलेटर, दोन चाकु, कागदपत्राच्या फाईली, तीन मोबाईल मिळाले.

याबाबत अधिक तपास केला असता सर्व साहित्य एटीएम फोडण्यासाठी वापल्‍याचे समोर आले. आरोपींनी करमाळा येथील एटीएम फोडून पळून आल्‍याची कबुली दिली. त्यांच्याकडून आयशर टेम्पोसह सर्व सामानासह ६ लाख २० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, विटा पोलीसांनी सर्व आरोपींना करमाळा पोलिसाच्या ताब्‍यात दिले. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -