Tuesday, December 24, 2024
Homeमनोरंजनसुनील शेट्टी यांनी दिले ‘हेरा फेरी 3’बद्दल अत्यंत मोठे अपडेट, चाहत्यांमध्ये उत्साह

सुनील शेट्टी यांनी दिले ‘हेरा फेरी 3’बद्दल अत्यंत मोठे अपडेट, चाहत्यांमध्ये उत्साह

ताजी बातमी ऑनलाईन टीम


हेरा फेरी 3 चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. हेरा फेरी 3 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. हेरा फेरी 3 चित्रपटामध्ये काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार दिसणार नसल्याचे सांगितले जात होते. या चित्रपटाला अक्षय कुमार याने नकार दिला होता. यानंतर हेरा फेरी 3 चित्रपटाचे निर्माते कार्तिक आर्यन याच्या संपर्कात होते. विशेष म्हणजे हेरा फेरी 3 ची स्क्रीप्ट कार्तिक आर्यन याला आवडली असल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र, अचानकपणे सर्वांनाच मोठा धक्का देत अक्षय कुमार याने या चित्रपटाला होकार दिला.

अक्षय कुमार याने चित्रपटाला होकार दिल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण एका कार्यक्रमामध्ये अक्षय कुमार याने जाहिरपणे म्हटले होते की, मला हेरा फेरी 3 ची स्क्रीप्ट अजिबात आवडली नसल्याने मी चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर निर्माते कार्तिक आर्यन याच्या संपर्कात होते आणि अचानक अक्षय कुमार याने होकार दिला.

आता हे स्पष्ट झाले की, हेरा फेरी 3 चित्रपटामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची जोडी धमाका करताना दिसणार आहे. आता नुकताच हेरा फेरी 3 चित्रपटाबद्दलचे अत्यंत मोठे अपडेट सुनील शेट्टी यांनी शेअर केले आहे. सुनील शेट्टी यांचे बोलणे ऐकून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टी म्हणाले की, सर्वकाही ठिक राहिले आणि कोणाची नजर लागली नाही तर सप्टेंबरमध्ये आम्ही हेरा फेरी 3 चित्रपटाचे शूटिंग सुरू करू. विशेष म्हणजे आम्ही सर्वजण हेरा फेरी 3 चे शूटिंग करण्यासाठी उत्साही आहोत. आम्ही काही दिवसांपूर्वीच प्रोमो शूट केला आहे.

पुढे सुनील शेट्टी म्हणाले की, मी, परेश रावल आणि अक्षय कुमार नेहमीच संपर्कात असतो. पंधरा वर्षे झाले आम्ही जोडले गेलो आहोत. आता चित्रपटाच्या शूटिंगची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहोत. हेरा फेरी 3 चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक नक्कीच आहे. चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

विशेष म्हणजे हेरा फेरी 3 मध्ये फक्त अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचाच धमाका बघायला मिळणार नसून थेट संजय दत्त देखील धमाल करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या रिपोर्टनुसार हेरा फेरी 3 मध्ये संजय दत्त देखील महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. याबद्दल बोलताना संजय दत्त देखील दिसला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -