ताजी बातमी ऑनलाईन टीम
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची लाडकी लेक आराध्या बच्चन ही नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे आराध्या बच्चन ही स्टार किड्सपैकी सर्वाधिक चर्चेत असते. आराध्या बच्चन ही नेहमीच आई ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासोबत दिसते. इतकेच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक पार्टी आणि पुरस्कार सोहळ्यात देखील आराध्या बच्चन दिसते. विशेष म्हणजे आराध्या बच्चन हिचा चाहता वर्गही मोठा आहे. अनेकजण आराध्या बच्चन हिचे काैतुक करताना सोशल मीडियावर दिसतात.
नुकताच आराध्या बच्चन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. आराध्या बच्चन हिचा हा व्हिडीओ चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ एका फॅन पेजवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओवर युजर्स हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आराध्या बच्चन ही शाळेच्या गणवेशमध्ये दिसत आहे. फक्त आराध्या बच्चन हिच नाही तर आराध्या हिच्यासोबत तिच्या काही मैत्रीणी दिसत आहेत. आराध्या बच्चन हिचा हा व्हिडीओ शाळेतील एका कार्यक्रमातील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये आराध्या बच्चन ही खूप गोड दिसत आहे.
आराध्या बच्चन हिचा हा व्हिडीओ अनेकांना आवडल्याचे दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात या व्हिडीओवर कमेंट केल्या जात आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, आराध्या बच्चन ही खूप जास्त सुंदर दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आराध्या बच्चन ही कोणाला तरी बोलताना दिसत आहे.
आराध्या बच्चन ही मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे. याच शाळेत इतरही काही कलाकारांची मुले शिकतात. अनेकदा आराध्या बच्चन हिच्या हेअर कटवरून ऐश्वर्या रायला नेटकरी सुनावताना दिसतात. 10 वर्षांपासून आम्ही आराध्याची एकच हेअर स्टाईल बघतो असे अनेकदा नेटकरी म्हणताना दिसतात.
काही दिवसांपूर्वीच आराध्या बच्चन ही अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत विमानतळावर स्पाॅट झाली होती. विशेष म्हणजे यावेळी पापाराझी यांना पाहून नमस्कार करताना आराध्या बच्चन ही दिसली होती. ज्यानंतर अनेकांनी आराध्या बच्चन हिचे काैतुक केले. आराध्या बच्चन हिचा तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.