Sunday, July 27, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; पृथ्वीराज चव्हाण यांची भाजपवर जोरदार टीका..

इचलकरंजी ; पृथ्वीराज चव्हाण यांची भाजपवर जोरदार टीका..

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इचलकरंजी, महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात सामना करून शकत नाही, लोकसभेला अपेक्षित यश मिळणार नाही, याची जाणीव झाल्यानेच भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ राबवण्यास सुरुवात केली. त्यातूनच पहिला शिवसेनेवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी दुसरा हल्ला राष्ट्रवादीवर केला, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केली. या फुटीनंतर राज्यात नेमके कोण कोणाकडे गेले हेच कळेना झाले आहे, असेही ते म्हणाले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी ते शनिवारी इचलकरंजीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चव्हाण यांनी मोदी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. मणिपूरमध्ये दंगली उसळल्या आहेत. मणिपूर जळत आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास ठरावावरील चर्चेत फारसे बोलले नाहीत. दोन तासांच्या भाषणात केवळ दोन मिनिटांत मणिपूरवर भाष्य केले. गुजरातमध्ये दंगली झाल्या होत्या. त्यावेळी मोदी मुख्यमंत्री होते. त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे गुजरातमध्ये गेले होते. छावण्यांना भेटी दिल्या. लोकांचे सांत्वन केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना राजधर्म पाळण्याचा आदेश दिला होता. मात्र आताचे पंतप्रधान मणिपूरच्या विषयावर बोलायलाही तयार नाहीत.

लोकांसमोर बेरोजगारी, महागाईचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना उचित मूल्य मिळत नाही. मात्र सरकारकडे त्यांची उत्तरे नाहीत. मोदींची केवळ घोषणाबाजी, जाहिरातबाजी झाली असली तरी मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांशी मोदी सरकार तुलना करू शकत नाही. नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कोसळली. जीएसटीमुळे छोटे उद्योग बंद पडले. मोठ्या प्रमाणात कर्ज काढल्याशिवाय सरकार चालवता येत नाही. कर्ज काढण्याची सीमाही संपली आहे. त्यामुळे आता कुणी कर्ज द्यायलाही तयार नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सची दहशत
सरकारी उद्योगांची भरमसाट विक्री सुरू आहे. सगळी विमानतळे विकली आहेत. मोठ्या कंपन्या अदानीला देण्याचे सुरू आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. विकास दर थंडावला आहे. त्यामुळे रोजगार मिळत नाही. परिणामी महागाईही कमी होत नाही. कर कमी करा म्हणून आम्ही आक्रोश करीत आहोत. पण कर कमी केल्यास सरकारच चालवता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून लोकांनी आता मोदी सरकारची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सरकार फक्त ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या दहशतीवर चालले असल्याची टीका चव्हाण यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -