Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरहृदय पिळवटून टाकणारी घटना! आजी, आजोबासह नातीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; घरात एकमेकांना...

हृदय पिळवटून टाकणारी घटना! आजी, आजोबासह नातीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; घरात एकमेकांना चिकटून पडले होते मृतदेह

शॉर्ट झालेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून आजोबा, आजी आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शाहूनगर, तिसरा क्रॉस येथे शनिवारी (ता. १२) सकाळी ही घटना घडली.ईराप्पा गणकाप्पा लमाणी ऊर्फ राठोड (वय ५०), शांतव्वा ईराप्पा लमाणी ऊर्फ राठोड (वय ४८), अन्नपूर्णा हुन्नाप्पा लमाणी ऊर्फ राठोड (वय ८ वर्षे, तिघेही मूळ रा. अरिबेंची तांडा, ता. रामदुर्ग सध्या रा. तिसरा क्रॉस, शाहूनगर, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत.या प्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात घरमालक, अभियंता आणि हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर आणि लाईनमनविरोधात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे.

पोलिसांनी घरमालक सरोजीनी फकिराप्पा नरसिंगण्णावर (रा. शाहूनगर), अभियंता इनामुल्ल हसनअल्लाउद्दीन जमादार (रा. शाहूनगर) यांच्यासह हेस्कॉमचे सेक्शन ऑॅफिसर आणि लाईनमनविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे.सरोजिनी या तिसरा क्रॉस, शाहूनगर येथे आपल्या नवीन घराचे बांधकाम करत आहेत. त्याठिकाणी राठोड कुटुंबियांना वॉचमन म्हणून कामासाठी ठेवले होते. वॉचमन कुटुंबियांना राहण्यासाठी शेड घालून देण्यात आले आहे. त्याठिकाणी वीजजोडणी दिली आहे.

वॉचमन राहत असलेल्या खोलीमध्ये घरमाल आणि अभियंत्याने असुरक्षितरित्या वीजवायर जोडणी केली होती. याची कल्पना हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर आणि लाईनमनला होती.पण, सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. नवीन घराचे स्लॅब घालण्यासाठी लोखंडी लाईप उभारण्यात आल्या आहेत. आठ वर्षीय अन्‍नपूर्णाचे वडील आणि आई हे देखील वॉचमनचे काम करतात. ते काल सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते.

सकाळी ६ ते ६.३० च्या दरम्यान शेडमधील शॉर्ट झालेल्या वायरला स्पर्श झाल्याने विद्युत धक्का बसून आजा-आजी आणि नातीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उघडकीस येताच हेस्कॉम आणि एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयातील शवागृहात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.एक नात वाचलीविजेचा धक्का बसल्याने नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरात आजोबा, आजी आणि नातीचे मृतदेह एकमेकांना लागूनच पडले होते.

ही घटना अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी होती. ही घटना घडली त्यावेळी आणखी एक नात झोपी गेली होती. ती गाढ झोपेत होती. त्यामुळे तिला या घटनेची पुसटशी कल्पनादेखील आली नाही. त्यामुळे ती बचावली. तीदेखील त्या ठिकाणी राहिली असती तर मोठा अनर्थ घडला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरु होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -