बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेल यांचा ‘गदर २’ हा चित्रपट कमाईच्या बाबतील धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट २०२३सालचा दुसरा सर्वात मोठा ओपनिंग करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.
या चित्रपटाने आता पर्यंत १३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. रविवारी या चित्रपटाने केजीएफ २ आणि बाहुबली २ या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ या चित्रपटाने रविवारी कमाईच्या बाबतीत ‘KGF 2’ आणि बाहुबली २ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. पहिल्या दिवशी ७.४३ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४३.०८ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने ५२ कोटी कमावले. चित्रपटाने एकूण १३५.१८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विकेंडला चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ झाली आहे.
पहिल्या आठवड्यातील रविवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये पठाण हा चित्रपट आहे. या चित्रपटाने ५८.६ कोटी रुपये कमावले होते. आता गदर चित्रपटाने ५२ कोटी रुपयांची कमाई करत केजीएफ २ आणि बाहुबली २चा रेकॉर्ड मोडला आहे. केजीएफने ५०.५३ रुपयांची कमाई केली होती तर बाहुबली चित्रपटाने ४६.५ कोटी रुपयांची कमाई केली होती. गदर २ चित्रपटाने ५२ कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.