ताजी बातमी ऑनलाईन टीम
क्रिकेट विश्वातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. स्टार फास्टर बॉलर याने तडकाफडकी क्रिकेटला रामराम केला आहे. या बॉलरने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय. हा खेळाडू गेल्या काही काळापासून दुखापतीशी झुंजत होता, परिणामी अखेर त्याने क्रिकेटला अलविदा करण्याचं ठरवलंय. हा खेळाडू गेल्या 6 वर्षांपासून क्रिकेटपासून दूर होता. या खेळाडूने अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना हा 2017 साली खेळला होता.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिन याने निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडला 3 वेळा प्रतिष्ठेची एशेस सीरिज जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. स्टीव्हनने निवृत्तीबाबत पत्रक प्रसिद्ध केलंय. या पत्रकात मी दुखापतीमुळे निवृत्त होत असल्याचं फीनने म्हटलंय. “मी तातडीने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत आहे. मी गेल्या 12 महिन्यांपासून शरीराशी झुंज देतोय. मी हरलोय”, अशा शब्दात फिनने आपली हतबलता व्यक्त केली आहे.
स्टीव्हन फिन काय म्हणाला?
“मी 2005 मध्ये मिडलसेक्ससाठी पदार्पण केलं. तेव्हापासून मी व्यवसायिक क्रिकेट खेळण्यास सक्षम ठरलो, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. इथपर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता. पण मजा आली. इंग्लंडसाठी 36 कसोटीसह एकूण 125 सामन्यात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणं हे स्वप्नवत आहे. ससेक्स क्रिकेट टीमने मला गेल्या 12 महिन्यांपासून पाठिंबा दिला, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.”, असं फिनने म्हटलं.
या स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय, क्रिकेट चाहत्यांना झटका
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -