Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगप्रेमासमोर मातृत्व हरलं! कॅन्सर उपचारासाठी जमा केलेले 50 हजार रुपये घेऊन मुलगी...

प्रेमासमोर मातृत्व हरलं! कॅन्सर उपचारासाठी जमा केलेले 50 हजार रुपये घेऊन मुलगी प्रियकरासह फरार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कॅन्सर झालेली आपली आई मृत्यूशी झुंज देत असताना, मुलीने उपचारासाठी जमा केलेले 50 हजार रुपये घेऊन पळ काढला. ही घटना समोर आल्यानंतर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. कारण मुलीने आईच्या आयुष्याऐवजी प्रेमाची निवड करत प्रियकरासह फरार झाली. यानंतर हतबल महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक कुमार बिष्णोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार मुलीच्या मामाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रामगढ ताल क्षेत्रात राहणारे या कुटुंबातील सर्वजण मुलीच्या अशा वागण्याने आश्चर्यचिकत आहेत. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. तसंच नेमकी काय कारवाई करता येईल, याचाही आढावा घेत आहेत.

आईच्या उपचारासाठी घेतलेले पैसे घेऊन मुलगी फरार
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी दोन वर्षं आधीही परिसरातील एका मुलासह फरार झाली होती. पण त्यावेळी कुटुंबीयांनी तिला माफ केलं होतं. पण यावेळी तिने सर्व हद्द पार केल्या आहेत. तिच्या आईवर गोरखपूर एम्समधील कॅन्सर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारासाठी त्यांनी घरात 50 हजार रुपये ठेवले होते. पण मुलगी पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली आहे.

पोलीस फरार मुलगी आणि तिच्या प्रियकराचा घेतायत शोध
मुलगी आपल्या कुटुंबाच्या विश्वासाला इतका मोठा तडा देईल असा विचार कोणीही केला नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे तक्रार आली आहे. सध्या आम्ही मुलीचा शोध घेत आहोत. सर्व्हिलन्सच्या माध्यमातून आम्ही तिची माहिती मिळवत आहोत. लवकरच दोघांनाही पकडलं जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -