ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पनवेलमध्ये महामार्गाची पाहाणी केली त्यानंतर पनवेलमधील कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंदोलन सुरु करण्याचं आव्हान केलं. असं आंदोलन करा की भविष्यात कोणालाही असे खराब रस्ते बनवताना आपल्या आंदोलनाची, भीती वाटली पाहिजे असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
माणगावमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मुंबई गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मनसे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड आणि कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांनी माणगाव इथलं चेतक सन्नी कंपनीत कार्यालय फोडलं.
पनवेलमध्ये राज ठाकरे यांच्या मेळाव्यावरुन परतताना मनसे कार्यकर्त्यांनी माणगावमध्ये तोडफोड सुरु केली. कार्यालयातील खूर्च्या आणि फर्निचरची तोडफोड करत कार्यकर्त्यांनी मनसेच्या घोषणा दिल्या. या घटनेनंतर कार्यालयाबाहेर पोलस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुढच्या काही दिवात महागार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशाराच मनसेने दिला आहे.