Saturday, August 2, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : टोमॅटो आवक वाढली, दरही आवाक्यात

कोल्हापूर : टोमॅटो आवक वाढली, दरही आवाक्यात

कधी नव्हे ती 150 ते 200 रुपये किलो विक्रमी दराने टोमॅटोची विक्री होत होती. त्यामुळे टोमॅटो जेवणातून हद्दपार झाला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून टोमॅटोच्या आवकेत वाढ होत आहे.त्यामुळे दरही कमी होत आहेत. सध्या घाऊक बाजारात सरासरी 50 ते 60 रुपये किलो दर झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्टअखेपर्यंत टोमॅटोचे दर पूर्ववत होतील, असे घाऊक विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, हातकणंगले, कागल आणि करवीर या चार तालुक्यांत सुमारे 403 हेक्टरवर टोमॅटोचे पीक घेतले जाते. यातील काही टोमॅटो कोल्हापूर शहरातील भाजी मंडईंमध्ये थेट विक्री केला जातो. त्यामधून शेतकर्‍यांना चांगला दर मिळतो; तर ज्या शेतकर्‍यांचे जास्त उत्पादन आहे, असे शेतकरी बाजार समितीत टोमॅटो विक्री करत असून, तेथेही सध्या 20 ते 35 रुपये किलो असा दर मिळत आहे. बाजारात हा दर 50 ते 60 रुपये किलो झाला आहे.गोव्यासह कोकणात पुरवठा

कोल्हापूर बाजार समितीत सांगली, सातारा आणि निपाणी, चिक्कोडी भागातून दररोज सरासरी 600 ते 650 क्विंटल टोमॅटोची आवक होते. यातील सुमारे 300 क्विंटल टोमॅटो कोल्हापूर शहर आणि कागल, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा आणि हातकणंगले तालुक्यांत पुरवठा केला जातो. तर सुमारे 350 क्विंटल टोमॅटो रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या भागात पुरवठा केला जातो. कोल्हापूर शहरासाठी दररोज सुमारे 300 कॅरेट टोमॅटो लागतो. उन्हाळ्यात मागणी वाढल्याने 400 ते 450 कॅरेटची विक्री होते.
कोल्हापूर बाजार समितीत जून, जुलै महिन्यात 11 हजार 240 क्विंटल आवक झाली. या दोन महिन्यांत 20 किलोंच्या कॅरेटचा दर 2 ते 3 हजार होता, तर सरासरी 100 ते 150 रुपये किलोचा दर होता. तोच दर आता 50 ते 60 रुपये किलो असा झाला आहे.वर्षात 1 लाख क्विंटल विक्री

कोल्हापुरात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 अखेर 1 लाख 2 हजार 357 क्विंटल टोमॅटोची विक्री झाली. याकाळात 7 लाख 14 हजार रुपयांची उलाढाल झाली. दर महिन्याला 1,450 क्विंटल (सरासरी 35 हजार कॅरेट) आवक होत होती. गेल्या तीन महिन्यांत त्यात घट झाल्याने टोमॅटोचा किलोचा दर 60 ते 80 रुपये असा होता. वर्षाचा दर सरासरी 5 ते 100 रुपये किलो असा झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -