Thursday, July 31, 2025
Homeब्रेकिंगपती-पत्नीचा वाद पोहचला विकोपाला, अंदाधुंद गोळीबारात…

पती-पत्नीचा वाद पोहचला विकोपाला, अंदाधुंद गोळीबारात…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मध्य प्रदेशातील मुरैना येथील युवकाने आपल्या पत्नीसह साळा आणि आणखी एकावर गोळीबार केला. घटनेनंतर तो फरार झाला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मुरैना येथील युवकाने पत्नीची गोळी झाडून हत्या केली. या गोळीबारात आणखी दोघांना गोळ्या लागून त्यांचाही मृत्यू झाला. तिसऱ्या एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचाही मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. या गोळीबारात एकूण तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले.

पत्नी माहेरी जात असताना अडवले
पती-पत्नीच्या वादामुळे पत्नी भावाला बोलावून आपल्या माहेरी जात होती. याची माहिती मिळताच पतीने त्यांना रस्त्यात अडवले. अंदाधुंद गोळीबार केला. ही घटना रविवारी दुपारी बागचिनी ठाण्याअंतर्गत घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम राबवली आहे.

भर रस्त्यात केला गोळीबार
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भर रस्त्यात गोळीबार केला. त्यावेळी रस्त्यावर बरेच लोकं उपस्थित होते. गोळीबार करून कुणाचा जीव घेईल, असं वाटलं नव्हतं. परंतु, गोळीबार केल्यावर लोकांना धक्काच बसला. आरोपी प्रचंड रागात होता. त्यामुळे त्याला पकडण्याचा कोणीही प्रयत्न केला न ाही. तिघांवर गोळीबार केल्यानंतर आरोपी तिथून पळून गेला.

मुरैनाचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीला अटक करण्यासाठी इलेक्ट्रिक सर्व्हायलन्सचा वापर केला जात आहे.

तिकडे हैदराबादमध्ये पती-पत्नीच्या वादात युवकाने आपल्या मुलीला संपवले. इकडे पत्नीसह साळा आणि आणखी एकावर गोळीबार करण्यात आला. हैदराबाद येथील प्रकरणात दोघेही सॉफ्टवेअर इंजिनीअर होते. दोघेही नोकरीवर असल्याने इगो आड येतो. अशावेळी वाद वाढत असल्याचे दिसून येतो. पण, या वादाचा परिणाम भयानक असतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -