उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापुरात सभा होतेय. या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या दसरा चौकामध्य हेे बॅनर लागलेत. . सभेच्या प्रवेशद्वाराजवळील बॅनरवर इतिहासाचा दाखला देत फुटीर नेत्यांवर टीका करण्यात आलीये. त्यामुळे शरद पवार उद्याच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय. उद्या शुक्रवारी (ता. २५) कोल्हापुरात राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा होणार आहे.
यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) शहरात बॅनरबाजी केली आहे. “बाप हा बापच असतो,” आणि “योद्धा पुन्हा मैदानात” असा मजकूर असलेलं बॅनर सध्या शहरात झळकू लागलंय. त्यामुळं या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्येक चौकाचौकांत असे बॅनर लावण्यात आले आहेत. खासदार शरद पवारांचा असा असेल दौराशुक्रवारी (ता. २५) दुपारी २ वाजता सातारा येथून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी साडेचार वाजता तावडे हॉटेल येथे पोहोचल्यानंतर तेथून ताराराणी चौकापर्यंत मोटरसायकल रॅलीने आगमन. हॉटेल पंचशील येथून दसरा चौक येथील सभेकडे ५ वाजून १५ मिनिटांनी प्रयाण. सभास्थळी ५.३० वाजता आगमन व रात्री हॉटेल पंचशील येथे मुक्काम.
शनिवारी सकाळी साडे नऊ ते ११ या वेळेत शिष्टमंडळांच्या भेटीगाठी, ११ ते ११.३० या वेळेत पत्रकार परिषद, १२ वाजता शाहू महाराज समाधीस्थळास भेट, १ ते २ या वेळेत जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या निवासस्थानी राखीव, ३.३० ते ५.३० हिंद मजदूर सभा अधिवेशनास उपस्थिती (महासैनिक दरबार हॉल) व ६ वाजता पुण्याकडे प्रयाण.
ऐतिहासिक दसरा चौकात उद्या (शुक्रवारी) हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज हे असणार आहेत. दरम्यान, सभेपूर्वी तावडे हॉटेल ते ताराराणी चौकापर्यंत पवार यांच्या स्वागत रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी मंत्री बाळासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.