पोस्ट ऑफिस बचत खाते (सुधारणा) योजना-२०२३ अंतर्गत आता संयुक्त खातेधारकांची संख्या वाढवण्यात आली आहे. यासोबतच पैसे काढणे आणि व्याज भरण्याबाबतच्या नियमांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस बचत खात्यात संयुक्त खातेदारांची संख्या वाढवली आहे. आतापर्यंत फक्त दोन लोकांच्या नावाने संयुक्त खाते उघडले जात होते, आता त्याची संख्या तीन केली आहे. म्हणजेच कुटुंबातील तीन सदस्य एका खात्यात भागीदार असतील. सर्व तीन भागीदार प्रौढ असणे आवश्यक आहे. संयुक्त खात्यात अल्पवयीन व्यक्तीचा समावेश केला जाऊ शकत नाही.
पैसे काढण्याच्या नियमात बदल
सरकारने पोस्ट ऑफिस खात्यातून पैसे काढण्याच्या नियमातही बदल केला आहे. आता ग्राहकांना पैसे काढण्यासाठी फॉर्म-२ ऐवजी फॉर्म-३ जमा करावा लागेल. या बदलानंतर आता ग्राहक फक्त पासबुक दाखवून खात्यातून किमान ५० रुपये काढूशकतात. यापूर्वी ५० रुपयांसाठीही फॉर्म २ भरून आणि पासबुकवर सही करून पैसे काढावे लागत होते. यासोबतच आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात किमान ५०० रुपये असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी असल्यास ५० रुपये शुल्क कापले जाईल.
जमा रक्कमेच्या व्याजाच्या गणनेत बदल
तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे, आता बचत खात्यामधील १० तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वात
कमी रकमेवर वार्षिक चार टक्के दराने व्याज दिले जाईल. अशा प्रकारे व्याजाची गणना केली जाईल आणि प्रत्येक
वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाईल.
जर एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाला, तर अशावेळी खातेदाराला त्याच महिन्यात व्याजाची रक्कम मिळेल ज्या
महिन्यात व्यक्तीचा मृत्यू झाला. भारतीय पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये (India Post Office Savings Schemes)
वेगवेगळे व्याजदर आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडल्यावर वार्षिक चार टक्के दराने व्याज दिले जाते.
पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटचे आता नवीन नियम, काय-काय बदलले, जाणून घ्या
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -