ताजी बातमी ऑनलाईन टीम
आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाचा बंगळुरू एनसीएमध्ये सराव सुरु आहे. या स्पर्धेसाठी दीर्घ काळापासून संघाबाहेर असलेल्या खेळाडूंची यो-यो ही फिटनेस चाचणी घेण्यात आली. 24 ऑगस्टला विराट कोहली याची चाचणी झाली.
विराट कोहली याने यो-यो टेस्टमध्ये मिळालेले गुण सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. विराटच्या या कृतीमुळे बीसीसीआयचा पारा चढला आहे. या प्रकरणी त्यांनी विराट कोहली याला समज दिली आहे.
विराट कोहलीने यो-यो टेस्टमध्ये पास झाल्याचं सांगत मिळालेले शेअर केले. विराट कोहली याला एकूण 17.2 गुण मिळाले आहेत. यामुळे या चाचणीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
विराट कोहली याने यो-यो टेस्टची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर टीम इंडिया व्यवस्थापन खडबडून जागं झालं आहे. फिटनेस स्कोअर ही गोपनीय बाब असून सोशल मीडियावर शेअर करू नये असं सांगण्यात आलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने शिबिरात सहभागी असलेल्या सर्व खेळाडूंना याबाबत ताकीद दिली आहे. अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून खडे बोल सुनावले आहेत.
Virat Kohli : विराट कोहली याच्या ‘त्या’ कृतीने बीसीसीआयचा संताप, आता सर्वच खेळाडूंना दिले असे आदेश
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -