Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगबॉम्बे रेस्टॉरंटजवळ चारचाकी गाड्यांचा भीषण अपघात; जयसिंगपुरातील 3 जागीच ठार, 4 जण...

बॉम्बे रेस्टॉरंटजवळ चारचाकी गाड्यांचा भीषण अपघात; जयसिंगपुरातील 3 जागीच ठार, 4 जण गंभीर जखमी

सातारा बॉम्बे रेस्टॉरंटनजीक दोन चारचाकी गाड्यांचा भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व मयत आणि जखमी जयसिंगपूर येथील असून आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीयेनिखिल शशिकांत चौखंडे, प्रियांका निखिल चौखंडे, शशिकांत यदुनाथ चौखंडे अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. महामार्गावर प्रवासी घेण्यासाठी महेंद्रा पिकअप थांबली होती. यावेळी पाठीमागून आलेल्या तवेरा गाडीचा टायर फुटून तवेरा गाडी थांबलेल्या पिकअपवर जाऊन आदळली. यामध्ये 3 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून बाजूला हटवण्यात आले आहे.तर, जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर पिकअप गाडीचा चालक फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या घटनेची नोंद शहर पोलिसांत करण्याचं काम सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -