चिपळूणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईलवरुन झालेल्या वादातून भावानेच भावाची हत्या केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी तांबड वाडीत घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. दोघांनाही 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रविंद्र सुर्वे असे मयताचे नाव आहे. तर संजय सुर्वे आणि वसंत हिलम अशी आरोपींची नावे आहेत.दारु पिताना वाद झाला
रविंद्रच्या घरी गुरुवारी रात्री दोघे भाऊ आणि वसंत हिलम हे तिघे दारु पार्टी करत होते. यावेळी रविंद्रकडे हिलमचा मोबाईल आढळला. यावरुन रविंद्र आणि हिलम यांच्यात वाद सुरु झाला. या वादातून रविंद्र लोखंडी पाईप घेऊन हिलमच्या अंगावर धावून गेला. यावेळी संजयने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही त्याच्या हातातील पाईप हिलमला चुकता लागला.
वाद विकोपाला गेला अन्…
संजय रविंद्रला खूप सावरण्याचा प्रयत्न करत होता, पण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यामुळे संतापलेल्या संजयने रागाच्या भरात त्याच्या हातातील पाईप घेऊन रविंद्रच्या डोक्यात मारला. तसेच धारदार हत्याराने वारही केले. यात गंभीर जखमी झालेल्या रविंद्रचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अलोरे-शिरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
दोघे भाऊ एकत्र बसून पार्टी करत होते, मोबाईलवरुन वाद झाला अन् जे घडलं ते भयंकर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -