या आठवड्यात येथील भाजी मंडईत सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक समाधानकारक झाल्याने दर थोडे उतरले आहेत. मागणीच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक वाढल्याने १० रुपयाला तीन-चार पेंड्या मिळत आहेत.पालक, पोकळा, मेथी, तांदळी, करडई यासारख्या भाज्या १० रुपयाला एक पेंडी आणि २० रुपयाला तीन पेंड्या मिळत आहेत. नवीन हंगामातील पडवळांची आवकही सुरू झाली आहे. प्रतिनग २०-२५ रुपयेप्रमाणे ते विकले जात आहे.टोमॅटोचे दर उतरले असून, ३० ते ४० रुपयेप्रमाणे विक्री होत आहे. दोडका, वांगी, कारली, सिमला मिरची, ओली मिरची, बीन्स, घेवडा, पापडी यासारख्या फळभाज्या आणि शेंगभाज्या ४० ते ६० रुपये किलो तर दिडका ३० ते ४० रुपये किलोने विकला जात आहे. कांदा, बटाट्याचे दर स्थिर आहेत.कांदा २०-३० तर बटाटा २५-३० रुपये किलोने विकला जात आहे. मात्र लसूण अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. धान्य बाजारात गहू, तांदूळ, ज्वारीचे दर तेजीत स्थिर आहेत. श्रावण मासानिमित्त सण-सोहळे सुरू झाल्याने गहू, हरभरा डाळ, गूळ यांना मागणी वाढली आहे. कडधान्ये आणि डाळींच्या दरात अद्यापही तेजीच आहे. मसाले, किराणा साहित्य, खाद्य तेलांचे दर स्थिर आहेत.फळ बाजारात नव्या हंगामातील सफरचंदाची (Apple) आवक वाढली आहे. नव्या-जुन्या सफरचंदाचे प्रतवारीनुसार दर ८०-१६० रुपये किलो असे आहेत. उपवासाचे दिवस असल्याने केळीच्या दरातही तेजी आहे. वसई ४०-५० तर जवारी ५०-८० रुपये प्रति डझन असे दर आहेत. मोसंबी, पेरू, सिताफळ, डाळिंब यांची आवक चांगली आहे. दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -