महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ ते २२ मार्च २०२४ दरम्यान होणार असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू होणार आहे. बारावीचा शेवटचा पेपर २३ मार्च २०२४ रोजी आहे.
याचबरोबर प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येणार आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे तसेच त्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा, या हेतूने परीक्षा बोर्डाने फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत. या परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रकर मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परंतु दहावी आणि बारावीच्या परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांना छापील स्वरूपात वेळापत्रक देण्यात येणार आहे. तेच वेळापत्रक अंतिम असेल, अशीही माहिती मंडळाने दिली आहे.
दरम्यान, अन्य संकेतस्थळ, अन्य यंत्रणेने छपाई केलेले, व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेलेले वेळेपत्रक ग्राह्य धरू नये, अशा सूचना देखील मंडळाने दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -