Thursday, May 30, 2024
Homeकोल्हापूरशरद पवारांनी भाजपला आव्‍हान देताच मुश्रीफ म्हणाले, 'त्यातही आम्हाला क्‍लीन चिट मिळणार'

शरद पवारांनी भाजपला आव्‍हान देताच मुश्रीफ म्हणाले, ‘त्यातही आम्हाला क्‍लीन चिट मिळणार’

राज्य बँक, सिंचन घोटाळ्यात क्‍लीन चिट मिळाली आहे. तसेच गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षणातूनही काहीही निघणार नाही. आणि त्यातूनही जरी काही निघाले तर त्यातही क्‍लीन चिट मिळेल’, असा विश्‍‍वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.ज्येष्‍ठ नेते शरद पवार यांनी राज्य बँक व सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याचे भाजपला आव्‍हान दिले आहे. यावर बोलताना मुश्रीफ म्‍हणाले, ‘या दोन्‍ही प्रकरणांची चौकशी झाली आहे. त्यामध्ये क्‍लीन चिट देण्यात आली असल्याने चौकशीचा काही प्रश्‍‍नच उद्भवत नाही.

याच पध्‍दतीने गोकुळमध्येही काही होणार नाही.मुळात लेखापरीक्षणाची काहीच गरज नाही. तरीही लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. यातून काही निघाले तरी गोकुळला क्‍लीन चिट मिळेल. मुश्रीफ पुढे म्‍हणाले, ‘राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने धोरण ठरवले आहे की, ज्या ठिकाणी शरद पवार यांची सभा झाली, त्या ठिकाणी सभा घेवून उत्तर द्यायचे नाही. त्यामुळे टीकाटिप्‍पणीपेक्षा जिल्‍ह्यातील प्रश्‍‍नांना १० सप्‍टेंबरच्या सभेत महत्‍व असेल.पंतप्रधान नरेंद मोदी यांनी साडेनऊ वर्षात सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्यामुळे विरोधातील मंडळी एकत्र येवून लढण्याचा प्रयत्‍न करत आहेत. लोकशाहीत सत्ताधारी, विरोधक असणार आहेत. त्यांच्या परीने ते प्रयत्‍न करत आहेत. मात्र भाजपविरोधात त्यांना यश मिळणार नाही.’

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -