Sunday, September 24, 2023
Homeब्रेकिंगSBI च्या ‘या’ खास योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्या; गुंतवणुकीसाठी फक्त काही...

SBI च्या ‘या’ खास योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्या; गुंतवणुकीसाठी फक्त काही दिवस बाकीसरकार प्रमाणे विविध बँका सुद्धा वेगवेगळ्या योजना (SBI WeCare FD Scheme) राबवत असतात. या योजनांमधून ते आपल्या खातेदारांना मदत करतात, तर बदल्यात बँकेच्या खात्यांमध्ये वाढ होत असते. एकार्थाने अनेक ग्राहकांना आपल्याजवळ आकर्षित कारण्यासाठी या योजना राबवल्या जातात. देशातील सर्वपरिचित बँक म्हणजे State Bank Of India, या बँकेकडून WeCare योजना राबवली जात आहे.

या योजनेत पैसे गुंतवल्यास आकर्षक असा रिटर्न ग्राहकांना मिळत आहे. तर या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.SBI WeCare FD Scheme ही एक Fixed Deposit करण्याची योजना आहे. या योजनेची सुरुवात वर्ष 2020 मध्ये करण्यात आली होती. असं म्हणतात की SBI च्या खातेदारांना याचा भरपूर फायदा झाला होता. मात्र ही योजना आपल्या शेवटच्या टप्प्यात असून 30 सप्टेंबर 2023 मध्ये ही योजना बंद होणार आहे.

State Bank Of India कडून वयोवृद्ध लोकांसाठी या योजने अनातर्गत मदत देऊ केली आहे. या योजनेमधून त्यांना पाच ते दहा वर्षांच्या गुंतवणुकीवर जास्ती व्याज देऊ केला जातो. या योजनेचा मुख्य उदेश वयोवृद्धांना त्यांच्या कठीण काळात आर्थिक मदत देऊ करावी हा आहे. त्यामुळे त्यांना term deposit वर इथे व्याजदर वाढवून दिला जातो. इतर गुंतवणुकीप्रमाणे इथे देखील तुम्ही मासिक किंवा तीन महिन्यातून एकदा ही गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक पूर्ण झालेल्या दिवशी व्याजासह TDS तुमच्या बँक खात्यात जमा केला जातो.

आत्ता या योजनेच्या कालावधीत वाढ करण्यात आली असून 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही नवीन गुंतवणूक किवा maturity झालेल्या गुंतवणुकीचा renewal करू शकता.SBI कडून या योजनेअंतर्गत (SBI WeCare FD Scheme) वयोवृधांसाठी 7.50% व्याजदर दिला जातो.

बाकी गुंतवणूक दारांसाठी हाच दर 7.20% असा आहे. या योजनेचा कालावधी 5 ते 10 वर्षांचा आहे. याचः अर्थ असा की एखादा व्यक्ती कमीत कमी पाच किवा जास्तीत जास्त दहा वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो. असं म्हणतात कि या योजनेत गुंतवणूक केलेल्या लोकांना भरपूर फायदा झाला आहे व गुंतवणुकीची रक्कम दहा वर्षात डबल झालेली आहे. त्यामुळे जास्ती वेळ न घालवता जर का इच्छुक असाल तर या योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र