Saturday, December 21, 2024
Homeब्रेकिंगराज्यात दहीहंडीचा थरार शिगेला !

राज्यात दहीहंडीचा थरार शिगेला !

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त देशभरातील मंदिरांमध्ये काल मध्यरात्रीपासून उत्सवाला सुरुवात झाली. मुंबई, ठाणेसह पुण्यातील अनेक भागात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबई, ठाण्यात सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून आला. यंदा गोविंदावर बक्षिसांचा मोठा वर्षाव करण्यात आल्याचे दिसून आले.

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आलेल्या टेंभीनाका मित्र मंडळाच्या दहीहंडी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या दहीहंडी महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी गोविंदांशी संवाद साधला. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रित सिंह आणि अभिनेता वाशु भगनानी हेदेखील खास पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः हजेरी लावली. यावेळी जय जवान गोविंदा पथकाने दहा थराचा मनोरा उभारण्याचा प्रयत्न केला. अतिशय उत्साहात गो.. गो..गोविदांच्या जोशात व गाण्यांच्या तालावर थिरकरणाऱ्या तरुणाईमुळे ठाण्यातील वातावरण उत्साहपूर्ण दिसून आले. यावेळी मनसेचे माजी आमदार तथा नेते बाळा नांदगांवकर, आमदार राजू पाटीलसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे शहरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १३ गोविंदा जखमी झाले आहेत. यामध्ये ९ गोविंदांना कळवा रुग्णालयात तर चार गोविदांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये एका महिला गोविंदाचा देखील समावेश आहे.

मुलुंड येथे आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमाला नृत्यांगना गौतमी पाटील हीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तिचे नृत्य सुरू असताना युवकांमध्ये गोंधळ उडाला तर यावेळी काही युवकांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली.
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने मागाठाण्यातील तारामती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेली दहीहंडी सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी गोविंदांशी संवाद साधला. गोविंदा मैदानात उतरले अन् पाऊस सुरू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -