Saturday, October 12, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत तिघा चोरट्यांकडून पाच घरफोडी उघडकीस!सव्वासहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

इचलकरंजीत तिघा चोरट्यांकडून पाच घरफोडी उघडकीस!सव्वासहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

इचलकरंजी सह पट्टणकोडोली, तळंदगे, हातकणंगले आदी ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या तिघा अट्टल चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमचंद उर्फ टल्या राहुल कांबळे ( वय १९), राजू फैजल काळे ( वय ४० दोघे रा. दावतनगर कबनूर) व रोहन नारायण पवार (वय २० रा. लक्ष्मीमाळ कबनूर) अशी त्यांची नांवे आहेत. या कारवाईत त्यांच्याकडून ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याची माहिती पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

काही महिन्यांपासून शहर व परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच तळंदगे (ता. हातकणंगले) येथे १ सप्टेंबर रोजी सराफी दुकानात चोरी झाली होती. त्याचा तपास सुरु असताना तेथील सीसीटिव्ही फुटेजवरुन
अटक केलेल्या संशयितांसह जप्त केलेला मुद्देमालासह पोलिस अधिकारी व कर्मचारी तपासाअंती चोरट्यांचा शोध लागला. संशयावरुन प्रेमचंद कांबळे, राजू काळे व रोहन पवार या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांनी संगनमताने पाच ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यामध्ये कबनूर दत्तनगर येथील मोहिद्दीन बापूलाल मारुफ यांचे मे महिन्यात घर फोडून १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सप्टेंबर महिन्यात तळंदगे येथील सराफी दुकान, जून आणि ऑगस्टमध्ये पट्टणकोडोली येथे दोन वेगवेगळ्या घरफोड्या आणि हातकणंगले येथेही घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटरसायकली, चांदीच्या ६१ अंगठ्यांचा ट्रे, १ मोबाईल, होम थिएटर, ७५०० रुपये, चांदीचा १२५ ग्रॅमचा मेकला, गणपती मूर्ती, सोन्याचे ५ तोळ्याचे गंठण, २ तोळ्याचा लक्ष्मीहार व १२.५ ग्रॅमचे प्रत्येकी १ नेकलेस व सोन्याची चेन असा सुमारे ६ लाख २४ हजार ५००रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आहे.

अटक केलेल्या तिघा संशयितांपैकी राजू काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सन २०१५ मध्ये गांधीनगर परिसरात त्याने तब्बल ११ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले होते. तर प्रेमचंद कांबळे व रोहन पवार यांच्या मदतीने ५ घरफोड्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

या चोरट्यांकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या तिघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक राजू ताशिलदार, पोलिस उपनिरिक्षक मनोज पाटील, पोलिस अंमलदार सुनिल बाईत, विजय माळवदे, प्रविण कांबळे, सुकुमार बरगाले, सतिश कुंभार, पवन गुरव, अरविंद माने आदींच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -