Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगआरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला सर्व सोयी-सुविधा देणार; मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला सर्व सोयी-सुविधा देणार; मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा

कुणबी दाखले देण्याबाबत विधी व न्याय विभागाचे मत घेऊनच निर्णय घेतला आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिले जाणार आहे. या आरक्षण प्रश्नावर संवेदनशील असून, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे.

तसेच आरक्षण मिळेपर्यंत समाजाला सर्व सोयी, सुविधा दिल्या जात आहेत, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखालील सरकार दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोचले आहे. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीच शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. ते ऑनलाइन मुख्यमंत्री होते, अशी टीका त्यांनी केली.


ते जाणीवपूर्वक टीका करत आहेत. आमचे सरकार दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोचले आहे. ते मुख्यमंत्री असताना कधीच शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. ते ऑनलाइन मुख्यमंत्री होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्हीही होतो. त्या वेळी ते मुख्यमंत्री असताना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आपण तेथील प्रश्न सोडवू, असे सांगितले होते; पण त्यांनी आमचे ऐकले नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावागावांत पोचले आहेत.”


वैयक्तिक लाभांच्या योजना लोकांना घरापर्यंत मिळाल्या आहेत. आमच्या चांगल्या उपक्रमाकडे जनतेचे लक्ष जातेय म्हणून ते टीका करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शंभूराज देसाई म्हणाले, “ जरांगे पाटील यांच्या आग्रहानुसार कुणबी दाखले देण्याबाबत विधी व न्याय विभागाचे मत घेऊनच शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयात सुधारणा करावी, अशी त्यांची मागणी आहे. शासन स्तरावर विचार विनिमय सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -