Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनघरबसल्या पाहाता येणार ‘जवान’ सिनेमा; जाणून घ्या कुठे आणि कसा?

घरबसल्या पाहाता येणार ‘जवान’ सिनेमा; जाणून घ्या कुठे आणि कसा?

वर्षाच्या सुरुवातील अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित झाला. ‘पठाण’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमा केला आणि फक्त भारतात नाही तर, जगभरात विश्वविक्रम रचला. ‘पठाण’ सिनेमानंतर अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर 2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. ‘गदर 2’ सिनेमाने 500 कोटी रुपयांचा आकडा पार केला. पण आता किंग खान याच्या ‘जवान’ सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ‘जवान’ सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 75 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमात किंग खान असल्यामुळे चाहते अभिनेत्याची झलक पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.

ॲक्शन सीन आणि अनेक ट्विस्ट असलेला ‘जवान’ सिनेमा पाहण्यासाठी अनेकांनी ॲडव्हान्स बुकिंग देखील केली. तर शनिवार आणि रविवार असल्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र शाहरुख खान स्टारर ‘जवान’ आणि सिनेमाच्या बॉक्स ऑफिसची चर्चा रंगत आहेत.

दरम्यान, अनेकांना सिनेमा पाहण्यासाठी वेळ नसेल, तर त्यांना देखील शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमा पाहता येणार आहे. किंग खान याच्या चाहत्यांनी घरबसल्या ‘जवान’ सिनेमा पाहता येणार आहे. पण त्यासाठी चाहत्यांनी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. त्यामुळे सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार याबद्दल सर्वजण उत्सुक आहेत.

सिनेमाच्या ओटीटी पदार्पणाबद्दल निर्मात्यांकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. पण सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेड चिलिज बॅनर खाली सिनेमा बनवण्यात आला आहे. रेड चिलिजचे अन्य सिनेमे ‘डार्लिंग्स’, ‘बेताल’, ‘बार्ड ऑफ लव्ह’ सिनेमे देखील ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत.

शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमा दोन महिन्यांनंतर म्हणजे दिवाळीच्या मुहुर्तावर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सिनेमे नेटफ्लिक्स सोबतच ॲमेझॉन प्राईमवर देखील प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. कारण ‘पठाण’ सिनेमा ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सिनेमा साकारण्यात आला आहे. सिनेमासाठी किंग खान याच्या मनधनाबाबत सांगायचं झालं तर, सिनेमासाठी किंग खान याने 100 कोटी मानधन घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या कमाईतील 60 टक्के भाग देखील शाहरुख खान याचा असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -