रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. एअरटेल आणि जिओ या दोन कंपन्यांमध्ये आपल्याला कायम टक्कर पाहायला मिळते.जिओचा असाच एक रिचार्ज प्लॅन आहे जो एअरटेलला टक्कर देतो. ज्याची वैधता एकूण 336 दिवसांची आहे. किमतीचा विचार करायचा झाला तर या प्लॅनची दररोजची किंमत 4 रुपये इतकी आहे. तुम्हाला फक्त एकदाच हा रिचार्ज करावा लागेल.
त्यानंतर संपूर्ण वर्षभर तुम्हाला कोणताच रिचार्ज करावा लागणार नाही. या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर यात अनलिमिटेड 5G डेटा, फ्री कॉल्स, Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शनचा आनंद घेता येतो. तसेच इतरही फायदे या प्लॅनमध्ये मिळतात.येईल 4 रुपये प्रतिदिन खर्च
रिलायन्स जिओचा हा 1559 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. ग्राहकांना कंपनीच्या या प्लॅनमध्ये एकूण 336 दिवसांची वैधता मिळते. एकंदरीतच, किंमत आणि वैधता पाहिली तर या प्लॅनची दररोजची किंमत एकूण 4 रुपये इतकी असणार आहे. दीर्घ वैधतेशिवाय ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण 3600 एसएमएस देखील मिळत आहेत.
इतकेच नाही तर कंपनीच्या प्लॅनमध्ये 24GB बल्क डेटा मिळत आहे. यामध्ये डेटा मर्यादा संपल्यानंतर, तुम्हाला 64 Kbps च्या वेगाने इंटरनेट वापरता येईल. तसेच कंपनीच्या या शानदार प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शनचा आनंद घेता येतो. परंतु चांगली गोष्ट अशी आहे की ग्राहकांना कंपनीच्या अनलिमिटेड 5G डेटासाठी पात्र असतील, म्हणजेच पात्र ग्राहकांना Jio च्या अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घेता येईल.एअरटेलचा 1799 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
खरंतर, एअरटेलचा 1799 रुपयांचा प्रीपेड प्लॅन असून या प्लॅनमध्ये ग्राहकांना पूर्ण 365 दिवसांची वैधता मिळत आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल, एकूण 3600 एसएमएस आणि 24GB मोठ्या प्रमाणात डेटा वापरायला मिळतो. अतिरिक्त फायदे म्हणून कंपनी या प्लॅनमध्ये अपोलो 24/7 सर्कल, मोफत हॅलोट्यून्स आणि मोफत विंक म्युझिक यांचा समावेश केला आहे. परंतु हे लक्षात घ्या की हा प्लॅन Airtel च्या अनलिमिटेड 5G डेटासाठी पात्र नाही.