शालांत परीक्षेचे बनावट प्रमाणपत्र दाखल करून पोस्ट खात्यात नोकरी मिळविलेल्या तरूणाविरूध्द विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी मिळालीप्रमोद कृष्णात आमणे (वय २९ रा.दामानीनगर, सोलापूर) यांने मे २०२२ मध्ये डाकपाल पदासाठी पोस्ट खात्यामध्ये नोकरीसाठी कागदपत्रे ऑनलाईन दाखल केली होती. या कागदपत्रातील माहितीच्या आधारे त्याची नेवरी शाखेत गुणांच्या आधारे निवड करण्यात आली. तसे नियुक्ती पत्र दिल्यानंतर तो १ सप्टेंबर २०२२ पासून कामावर हजर झाला.दरम्यानच्या काळात त्याच्या गुण प्रमाणपत्राची पडताळणी परीक्षा मंडळाकडे करण्यात आली. यावेळी त्याने दाखल केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याची माहिती समोर आली. यामुळे त्याच्याविरूध्द विटा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -