Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानआता कोणत्याही भाषेत ट्रान्सलेट करू शकाल ई-मेल; जीमेलमध्ये आलं मल्टी-लँग्वेज फीचर

आता कोणत्याही भाषेत ट्रान्सलेट करू शकाल ई-मेल; जीमेलमध्ये आलं मल्टी-लँग्वेज फीचर

आजकाल बऱ्याच गोष्टींसाठी ई-मेलचा वापर केला जातो. एखाद्या परीक्षेचं वेळापत्रक, हॉल तिकीट किंवा नोकरीसाठी अर्ज करणे अशा बऱ्याच गोष्टींसाठी ई-मेलचा वापर केला जातो. नोकरीमध्ये तर जवळपास सर्व महत्त्वाची कामं मेलवरच होतात.मात्र, जर तुम्हाला अचानक वेगळ्याच भाषेत ई-मेल आला तर? अशा वेळी बऱ्याच जणांना गडबडून जायला होतं. मात्र आता गुगलच्या जीमेलमध्ये मल्टी-लँग्वेज फीचर देण्यात आलं आहे. यामुळे तुम्ही दुसऱ्या भाषेतील ई-मेल हिंदी किंवा इंग्रजीसह इतर भाषांमध्ये ट्रान्सलेट करता येणार आहे.जीमेलची ही सेवा डेस्कटॉप व्हर्जनसाठी आधीपासून उपलब्ध होती. मात्र, आता हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईसवर देखील आलं आहे. यामुळे तुमचा ई-मेल 100 हून अधिक भाषांमध्ये ट्रान्सलेट होऊ शकणार आहे.

अशा प्रकारे करा उपयोगयासाठी तुम्हाला सर्वात आधी जीमेल अ‍ॅप उघडावं लागेल. यानंतर जो ई-मेल तुम्हाला वाचायचा आहे, तो ओपन करा. यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करा. यानंतर जे पर्याय येतील, त्यामधील ट्रान्सलेट ऑप्शन निवडा.यानंतर तुमच्यासमोर विविध भाषांचे पर्याय उपलब्ध होतील. यामधील ज्या भाषेत तुम्हाला तो ई-मेल ट्रान्सलेट करून हवा आहे, ती भाषा निवडा. यानंतर काही सेकंदांमध्येच संपूर्ण ईमेल ट्रान्सलेट होऊन दिसेल.बीटा फेजमध्ये फीचरहे फीचर सध्या बीटा फेजमध्ये आहे. त्यामुळे हे पूर्णपणे विश्वासार्ह नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. विशेषतः टेक्निकल गोष्टी किंवा कायदेशीर बाबींमध्ये यावर पूर्णपणे विसंबून राहू नका, असा इशाराही कंपनीने दिला आहे. या माध्यमातून एका वेळी एकच ई-मेल ट्रान्सलेट करता येऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -