पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकशाहीचा पाया असणाऱ्या स्वायत्त संस्था काबीज केल्या. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. भाजप विरोधातील सर्व पक्ष एक झाले तर मोदींचा पराभव निश्चित होईल, असं स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केलं.लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून, या निवडणुकीला भाजपविरुद्ध इंडिया आघाडी उमेदवार अशाच पद्धतीने सामोरे गेले पाहिजेत,’ असे प्रतिपादनही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काँग्रेसच्या (Congress) जनसंवाद पदयात्रेच्या अंतर्गत वडणगे (ता. करवीर) येथे झालेल्या संवाद सभेमध्ये ते बोलत होते.प्रयाग चिखली येथून संध्याकाळी ५ वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. वडणगेत यात्रेचा समारोप झाला. माजी जिल्हा परिषद सदस्य बी. एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘देशाची स्थिती आराजकतेकडे निघाली आहे. कर्जाचा बोजा वाढत आहे. देशामध्ये धार्मिक आणि जातीय तेढ मुद्दाम वाढवली जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला तर पुढील विधानसभा निवडणुकही होणार नाही. देशात हुकूमशाही येईल.चव्हाण पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशात वातावरण असून, काँग्रेसवर सामान्य माणसाचा विश्वास आहे. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत ५० टक्केपेक्षा जास्त लोकांनी भाजपविरोधात मतदान केले, मात्र ही मते विखुरल्याने ३० टक्के मते घेणारे मोदी सत्तेत आले, असे होऊ नये म्हणूनच २८ पक्षांची मोट बांधून इंडिया आघाडी बनवली. याची भाजपने इतकी धास्ती घेतली की त्यांनी देशाचे नावच भारत करण्याचा विचार सुरू केला. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे हे एकच लक्ष्य ठेवले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -