Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगदुष्काळाच्या छायेत मराठवाड्याचे येणार ‘अच्छे दिन’; मिळणार ‘इतके’ हजार कोटींचे पॅकेज

दुष्काळाच्या छायेत मराठवाड्याचे येणार ‘अच्छे दिन’; मिळणार ‘इतके’ हजार कोटींचे पॅकेज

मागच्या काही वर्षांपासून मराठवाड्यात कधी अतिवृष्टी तर कधी कमी पावसामुळे शेतकऱ्यांसह अनेकांचे हाल होत आहे. यावेळी देखील मराठवाडा कोरड्या दुष्काळाच्या छायेत आहे.

 

तर दुसरीकडे मराठवाड्यासाठी उद्याचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. याचा मुख्य कारण म्हणजे उद्या औरंगाबाद शहरात राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे.समोर आलेल्या माहितीनुसार या विशेष बैठकीमध्ये मराठवाड्यासाठी 40 हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनांचे पॅकेज जाहीर होणार आहे. सूत्रानुसार या योजनांध्ये प्रामुख्याने सिंचन, वैद्यकीय महाविद्यालय, रस्ते विकास प्रकल्प आणि कृषि महाविद्यालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. (Marathwada Cabinet Meeting)

 

शेतकऱ्यांचे बैठकीकडे विशेष लक्ष

 

मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून अतिवृष्टी होताना दिसत आहे तर यंदा पावसाने दांडी मारली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. म्हणून उद्या होणाऱ्या या विशेष बैठकीमध्ये सर्वाधिक पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कृषी विभागाने 600 कोटीचा प्रस्ताव मुख्यंमत्री कार्यालयाकडे सादर केला आहे अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

वेगवेगळ्या विभागांचे प्रस्ताव

 

कृषी विभाग : 600 कोटी

वैद्यकीय शिक्षण विभाग : 500 कोटी

महिला व बालकल्याण विभाग : 300 कोटी

 

शालेय शिक्षण विभाग : 300 कोटी

 

क्रीडा विभाग : 600 कोटीउद्योग विभाग : 200 कोटी

 

सांस्कृतिक कार्य विभाग : 200 कोटी

 

नगरविकास विभाग : 150 कोटी

 

सिंचन विभाग : 21 हजार कोटी

 

सार्वजनिक बांधकाम विभाग :10 ते 12 हजार कोटी

 

ग्रामविकास विभाग : 1हजार 200 कोटी

 

निवडणुकीपूर्वीची बैठक

 

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने ही बैठक महत्वाची ठरणार आहे. मराठवाड्यातील मतदारांना खुश करण्यासाठी सरकार अनेक मोठ्या घोषणा करणार असल्याची देखील माहितीची समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -