ताजी बातमी ऑनलाईन टीम
व्हॉट्सअपने नुकतेच युझर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. त्याचे नाव व्हॉट्सअप चॅनल असे आहे. या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही जगभरातील अनेक सेलिब्रिटीशी थेट जोडल्या जाल. अनेक दिग्गजांनी तर WhatsApp Channels वर खाते पण तयार केले आहे. या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या सेलेब्रिटींविषयी आता तुम्हाला थेट त्यांच्या चॅनल्सवरुन अपडेट मिळतील. त्यासाठी तुम्हाला इकडे-तिकडे फिरण्याची गरज नाही. विशेष म्हणजे हे फीचर आतापर्यंतच्या ग्रुप्स आणि कम्युनिटी चॅनलपासून वेगळे आहे. हे फीचर एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड नाही. त्यामुळे या फीचरवर अनेक जण फिदा झाले आहेत. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्वतःचे व्हॉट्सअप चॅनल तयार करता येईल.
इन्स्टाग्रामच जणू
व्हॉट्सअपचे चॅनल हे जणू इन्स्टाग्रामचं आहे. यामध्ये एडमिनला फोटो, व्हिडिओ, व्हाईस नोट, इमोजी त्याच्या फॉलोअर्ससाठी पोस्ट करता येईल. लेटेस्ट अपडेट पण मिळवता येईल. व्हॉट्सअपने चॅनल फीचर आणल्यापासून अनेक जणांच्या डोक्यात एकच गोष्ट येत आहे की, स्वतःचे चॅनल कसे तयार करता येईल?
अनेक बदलांची नांदी
WhatsApp Channel फीचर ताजे ताजेच आहे. यामध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे. एडमिन एका महिन्यात त्याची पोस्ट एडीट करु शकतो. पण त्यानंतर त्याला एडिट करता येणार नाही. एडमिन पोस्ट करेल तेव्हा इतर युझर्सला चॅनल ज्वाईन होण्यासाठी लिंक देण्यात येईल. या फीचरशी जोडण्यासाठी अगोदर एप अपडेट करावे लागेल. तरच पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल.
व्हाट्सअप चॅनल सुरु करताना हे ठेवा लक्षात
व्हॉट्सअप चॅनल सुरु करण्यासाठी तुमच्याकडे व्हॉट्सअप बिझनेस अकाऊंट असणे गरजेचे आहे. तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअपचे लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे. टू स्टेप व्हेरिफिकेशन असणे गरजेचे आहे. WhatsApp Channel तयार करण्यासाठी या स्टेप समजून घ्या.
असा सुरु करा चॅनल
स्टेप 1: सर्वात अगोदर व्हॉट्सअप उघडा.
स्टेप 2: त्यानंतर अपडेट टॅबवर जा. आयकॉनवर क्लिक करा. ऑप्शनवर क्लिक करा. याठिकाणी न्यू चॅनल पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.
स्टेप 3: Get Started वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवरील निर्देशांचे पालन करा.
स्टेप 4: चॅनलला नाव द्या, अकाऊंट तयार करा.
स्टेप 5: त्यानंतर चॅनल कस्टमाईज करण्याचा पर्याय मिळेल. अजून सर्वच मोबाईलवर हे फीचर येईल असे नाही. व्हॉट्सअप अपडेट करा. तरीही फीचर आले नसेल तर थोडा वेळ वाट पाहा.
असे तयार करा स्वतःचे व्हॉट्सअप चॅनल! चुटकीत होईल काम
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -