ताजी बातमी ऑनलाईन टीम
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील ब्लाइंड मर्डर केसप्रकरणी पोलिसांनी अवघ्या आठवड्याभरातच धक्कादायक खुलासा केला आहे. ही हत्येसाठी दुसरं-तिसरं कोणीही नव्हे तर मृत इसमाची पत्नीच जबाबदार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. पत्नीने तिच्या इतर साथीदारांसोबत हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी मृताच्या पत्नीसह इतर चार आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, ती महिला तिच्या पतीसोबत रहात होती, मात्र तिचं दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम होतं. मात्र पतीला ही गोष्ट समजल्यानंतर तो या प्रेमात अडसर ठरू लागला. त्यामुळे त्याची पत्नी संतापली आणि तिने तिच्या प्रियकरासोबत हत्येचा हा कट रचला. याच कटाचा एक भाग म्हणून आरोपींनी त्या महिलेच्या पतीला कामाचा बहाणा करून 11 सप्टेंबर रोजी बाराबंकी येथे बोलावले. आणि तो तेथे आल्यानंतर रॉडने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिले दोन दिवस तर मृत व्यक्तीची ओळखच पटत नव्हती. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर मृत इसम कोण हे समजले असता, पोलिसांनी त्याच्या पत्नीकडे चौकशी केली. आणि अवघ्या काही दिवसांतच हत्येचा उलगडा झाला. आरिफ असे मृत इसमाचे नाव असून तो सीतापूरचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृत इसमाची ओळख पटल्यानंतर हत्येसंदर्भात पोलिसांनी आणखी तपासाला सुरूवाता केली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी त्याच्या पत्नीचीही चौकशी केली असता तिच्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे त्यांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि कठोरपणे तिची चौकशी केली. अखेर तिने तिचा गुन्हा कबूल करत आपणच पतीची हत्या केल्याचे सांगितले. तिच्या साथीदारांचीही नावे तिने उघड करत पतीचा अडसर कसा दूर केला, तेही स्पष्ट केले. आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, ती तिच्या पतीसोबत गुजरातमध्ये राहत होती, मात्र आरोपींपैकी एक मुजाहिदसोबत तिचे विवाहबाह्य संबंध होते. हा प्रकार तिच्या पतीला कळल्यावर तो त्यांच्या प्रेमात अडथळा बनत होता.
त्यामुळे ती संतापली आणि तिने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करण्याचा प्लान आखला. त्यानंतर तिच्या प्रियकराने त्याच्या दोन साथीदारांसह, कामाच्या बहाण्याने तिच्या पतीला बाराबंकी येथे बोलावले. रेल्वे स्थानकाजवळ भेटल्यानंतर त्यांनी त्याच्या डोक्यात रॉडने वार केले. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपींनी त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला आणि ते फरार झाले. आरोपी महिलेच्या कबुलीनंतर पोलिसांनी तिचा प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांनाही अटक केली. त्यांना कोर्टासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली.
ती बॉयफ्रेंडसोबत होती अन् पतीनं पाहिलं…. मग पतीच ‘गायब’ झाला, असा झाला गुन्ह्याचा उलगडा !
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -