भारत आणि श्रीलंकेमध्ये आज आशिया कपसाठी लढत होणार असून फायनल सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ आपली पूर्ण ताकद लावताना दिसतील. भारतीय सामन्याचं पारडं जड मानलं जात असलं तरीसुद्धा श्रीलंकेचा संघ काही कमी नाही. सुपर 4 मधील सामन्याध्ये गोलंदाजांनी भारताला वाचवलंं, नाहीतर जवळपास श्रीलंकेने भारताला पाणी पाजल्यात जमा होतं. आज गेल्या सामन्यातील चुका सुधारत भारताचे खेळाडू त्यांचा क्लास दाखवून देतील. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये संघात काही बदल करण्यात येणार आहेत.संघात नेमके कोणते बदल होणार?
आज होणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये हार्दिक पंड्या, विराट कोहली, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह हे कमबॅक करणार आहेत. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. मात्र या सामन्याता भारताला पराभवाचं तोडं पाहावं लागलं होतं. आजच्या सामन्यात अक्षर पटेल, मोहम्मद शमी यांना संधी मिळाली होती. रोहित आज शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी कोणाला संधी देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन्ही संघांचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत सातवेळा विजेतेपदावर नाव कोरलं आहे. ज्यामध्ये वनडेमध्ये सहावेळा तर टी-20 चा समावेश आहे. श्रीलंकेने सहावेळा आतापर्यंत आशिया कपची ट्रॉफी जिंकली आहे. पाकिस्तानने दोनवेळा जेतेपद जिंकलं आहे. भारताने 1984, 1988, 1990, 1995, 2010, 2016, 2018 मध्ये ट्रॉफी आपल्या नावावर केली होती.भारताचे संभाव्य प्लेइंग-11: रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.