गणेश चतुर्थीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा केला जातो. यंदा 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर असा दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या काळात वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोठ्या बँकांना वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या असणार आहेत.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 18, 19 आणि 20 सप्टेंबर रोजी काही शहरांमध्ये सार्वजनिक सुटी असणार आहे. त्यामुळे विविध राज्यांतील बँकांच्या कामकाजावर तीन वेगवेगळे दिवस परिणाम होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI Holiday List 2023) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, 18 सप्टेंबर रोजी बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि तेलंगणामध्ये वरसिद्धी विनायक व्रत/विनायक चतुर्थी निमित्त सुट्टी असेल.
त्याचबरोबर मुंबई, नागपूर, अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर आणि पणजी येथे 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) निमित्त बँका बंद राहतील.RBI च्या म्हणण्यानुसार, गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, भुवनेश्वर आणि पणजीमधील बँकांमधील कामकाज 20 सप्टेंबर रोजी विस्कळीत राहील. या दोन्ही शहरांमध्ये सलग दोन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या यादीनुसार, सप्टेंबर 2023 मध्ये 12 अधिकृत सुट्ट्या असतील. तथापि, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी येऊ शकतात. याशिवाय रविवारी आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारी बँकांमधील कामकाज बंद राहणार आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये एकूण बँक सुट्ट्यांची संख्या खूपच जास्त आहे.
सप्टेंबरमधील सुट्ट्यांची यादी-
22 सप्टेंबर 2023- श्री नारायण गुरु समाधी दिन (कोची, पणजी आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील)
23 सप्टेंबर 2023- चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.24 सप्टेंबर 2023- रविवार
25 सप्टेंबर 2023- श्रीमंत शंकरदेव यांची जयंती (गुवाहाटीमध्ये बँका बंद राहतील)
27 सप्टेंबर 2023- मिलाद-ए-शरीफ (Milad-i-Sherif) (जम्मू, कोची, श्रीनगर आणि त्रिवेंद्रममध्ये बँक हॉलिडे)
28 सप्टेंबर 2023- ईद-ए-मिलाद (अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगणा, इंफाळ, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची येथे बँक सुट्टी)
29 सप्टेंबर 2023- ईद-ए-मिलाद-उल-नबी / इंद्र जत्रा (गंगटोक, जम्मू, श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील