आगमन व विसर्जन या दोन दिवशी मुख्य मार्गांवर असलेल्या मांसाहार व मद्य विक्री पूर्णपणे बंद करावी, अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी येथील सकल हिंदू समाज यांच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे, प्रांताधिकारी मौसमी बडे – चौगुले, शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांना देण्यात आले.
हिंदुस्थानातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव म्हणून गणेशोत्सव ओळखला जातो. अतिशय सांस्कृतिक, मंगलमय आणि अपार भक्तिमय भावनेने हा सण साजरा केला जातो. अलीकडच्या काळामध्ये या पवित्र उत्सवात काही हिडीस व बीभत्स प्रवृत्तीचा शिरकाव झाल्याने या सणांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. या उत्सवाचे पावित्र्य राखण्यात यावे म्हणून यावर्षीपासून गणेशोत्सव आगमन व विसर्जन या दोन दिवशी मुख्य मिरवणुकीच्या मार्गावरून मांसाहार व मद्य विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात गजानन महाराज, निखिल ठकार, शेखर सुकुंडे, दत्तात्रय जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.