पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली-सांगली फाटा शेजारी एका हॉटेल समोर डंपरने पाठिमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. संतोष मलगोंडा पाटील (वय.३४, रा. जनवाड, ता.चिक्कोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक)असे मृताचे नाव आहे. हा अपघात आज, शनिवारी सकाळच्या सुमारास झाला. या अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
अधिक माहिती अशी, संतोष पाटील हा सकाळी आपल्या गावाकडून शिरोली एमआयडीसीमध्ये दुचाकीवरुन कामाला येत होता. याचवेळी बंगळूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात संतोष पाटील हा जोरात उडून रस्त्यावर आपटला आणि त्याच्या अंगावरुन डंपर गेल्याने तो जागीच ठार झाला. आपल्या सहकारी मित्राचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू पाहून संतोषचे मित्र घायमोखलून रडत होते. डंपर चालकाने डंपर सोडून घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या फौजदार नंदिनी मोहिते आणि शुभांगी पाखरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह सीपीआरला पाठवण्यात आला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.
डंपरने पाठिमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार, शिरोली सांगली फाट्यावर झाला अपघात
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -