सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. देशात सप्टेंबर (September) महिन्यानंतर अनेक बदल पाहायला मिळणार आहे. या महिन्यात अनेक आर्थिक कामांसाठी शेवटची मुदत (Deadline) आहे, जी तुम्ही वेळीच पूर्ण करायला हवी. ही कामं वेळीच पूर्ण न केल्यास तुमचं आर्थिक (Finance) नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे 30 सप्टेंबर 2023 रोजी होणार्या 5 बदलांबद्दल माहिती घेऊयात…स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये पॅन-आधार लिंक
आर्थिक विभागाच्या म्हणण्यानुसार, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत छोट्या बचत योजनेत पॅन कार्ड आधारशी लिंक करणं आवश्यक झालं आहे. त्यामुळे, तुम्ही तुमचं बचत खातं किंवा पोस्ट ऑफिस स्कीम शक्य तितक्या लवकर पॅन कार्ड, आधार कार्डशी लिंक करा, जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमचं खातं गोठवलं जाईल.
छोट्या बचत योजनेत आधार कार्ड-पॅन कार्ड खातं लिंक नसल्यास 1 ऑक्टोबर 2023 पासून खातं गोठवलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल. आधार-पॅन खात्याशी लिंक न केल्यास व्याज देखील मिळणार नाही.
2000 च्या नोटा बदलणं
RBIने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 ठेवण्यात आली होती. 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्या लागणार आहेत, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं
SBI बँकेची स्पेशल एफडी
ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI बँकेची एक मुदत ठेव योजना आहे. या We Care ठेव योजनेत गुंतवणूक करण्याची 30 सप्टेंबर 2023 ही अंतिम मुदत आहे. या योजनेसाठी फक्त ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत, जे उच्च एफडी व्याज दर घेऊ शकतात. SBI WeCare योजना 7.50 टक्के व्याजदर देते.
IDBI बँकेची अमृत महोत्सव एफडी
375 दिवसांच्या अमृत महोत्सव एफडी योजनेअंतर्गत, IDBI बँक सामान्य, NRE आणि NRO ला 7.10 टक्के व्याजदर देते. बँक ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज दर ऑफर करते. या योजनेअंतर्गत बँक सर्वसामान्य नागरिकांना 7.15 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांसाठी 7.65 टक्के व्याज देते. त्यामुळे या एफडीचा फायदा तुम्ही लवकरात लवकर घेऊ शकता.
डीमॅट, एमएफ नॉमिनेशन
SEBI ने ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांसाठी नावनोंदणी किंवा नाव कमी करण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. सुधारित मुदतीनुसार, अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
30 सप्टेंबरपूर्वी ‘ही’ कामं कराच, नाहीतर होईल मोठं नुकसान; तुमच्या आर्थिक व्यवहारांवरही होईल परिणाम
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -