Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीला दररोज पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशिल!आमदार प्रकाश आवाडे

इचलकरंजीला दररोज पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशिल!आमदार प्रकाश आवाडे

  1.  कृष्णा योजना जलवाहिनी बदलाचे काम प्रत्यक्षात सुरु झाले असून लवकरच हे काम पूर्ण होऊन इचलकरंजी शहराला दररोज पाणी मिळू शकेल, असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. तर शिरढोण (ता. शिरोळ) मधील शंकांचे समाधान झाले असून जी मुख्य जलवाहिनी या भागातून गेली आहे त्यामधून माळभागात आवश्यक त्याठिकाणी नळकनेक्शन उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाहीही आमदार आवाडे यांनी दिली.

इचलकरंजी शहराला सातत्याने भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपात निकाली निघावा यासाठी आवश्यक कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या उर्वरीत म्हणजेच कुरुंदवाड ते मजरेवाडी जॅकवेल पर्यंतच्या जलवाहिनी बदलाचा शुभारंभ रविवारी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व पाईपचे पुजन करुन करण्यात आला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता अमित पाथरवट, उपअभियंता काटकर, महापालिका जलअभियंता सुभाष देशपांडे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार आवाडे यांनी, शासनाने मंजूरी केलेल्या सुळकूड उद्भव दुधगंगा योजनेचे पाणी इचलकरंजीला निश्चितपणे मिळणारच आहे. परंतु ती योजना पूर्ण होऊन कार्यान्वित होईपर्यंत कालावधी लागणार असल्यामुळे मधल्या काळात इचलकरंजीला पिण्याचे पाणी मिळून पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी कृष्णा आणि पंचगंगा योजना बळकट करुन दररोज पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्या अनुषंगाने कृष्णा योजनेची मजरेवाडी ते कुरुंदवाड- इचलकरंजी फाटा, शिरढोण लक्ष्मी मंदिर ते काळा ओढा आणि काळा ओढा ते इचलकरंजी जलशुध्दीकरण केंद्र या तीन टप्प्यातील ५.२ किलोमीटरची जलवाहिनी बदलावी लागणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -