Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरनिपाणीतील सख्ख्या भावांना कोल्हापुरातील चोरीप्रकरणी अटक; तब्बल 12 गुन्हे उघडकीस, 'इतक्या' लाखांचा...

निपाणीतील सख्ख्या भावांना कोल्हापुरातील चोरीप्रकरणी अटक; तब्बल 12 गुन्हे उघडकीस, ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

च्या गुन्ह्यातील हद्दपार दोघा सख्ख्या भावांना कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) चोरीप्रकरणी अटक केली. अशरफअली शेरअली नगारजी (वय १९) आणि सैफअली शेरअली नगारजी (२३, दोघे. रा. दर्गागल्ली, निपाणी) अशी त्यांची नावे आहेत.या दोघांच्या चौकशीतून दुचाकी चोरी आणि चेन स्नॅचिंगचे १२ गुन्हे उघडकीस आले व ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती उपअधीक्षक अजित टिके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शाहूपुरी पोलिस (Shahupuri Police) ठाण्यातील पथकाने कारवाई केली.कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वाहने आणि चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विशेष तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार शाहूपुरीच्या पथकाने सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीद्वारे तपास केला, तेव्हा काही चोरटे कदमवाडी परिसरात भाडेतत्त्वावरील घरात रहातात.हे दोघे शहरासह जिल्ह्यात दुचाकी आणि चेनस्नॅचिंग करायचे आणि पुन्हा कर्नाटकात जाऊन रहायचे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार शोध घेतला तेव्हा ते निपाणीतून हद्दपार असल्याची माहिती पुढे आली. या दोघांचा पोलिसांनी तेथील पोलिस ठाण्याकडून ताबा घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी चिक्कोडीच्या उपअधीक्षकांकडून परवानगी घेऊन दोघांनाही अटक केली.त्यांच्या चौकशीत जिल्ह्यातील बारा ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिल्यावर मुद्देमालही जप्त करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, सहायक फौजदार संदीप जाधव, हवालदार संजय जाधव, मिलिंद बांगर, लखनसिंह पाटील, शुभम संकपाळ, बाबासाहेब ढाकणे, रवी आंबेरक, विकास चौगुले, महेश पाटील, वीरेंद्र वडेर यांनी ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -